Category: Erotic Couplings Stories

Randi No. 2: Saloni

by saagar_manthan©

रंडी नं २ - सलोनी

*****

ही कथा माझी आधीची कथा 'रंडी नं १' चा पुढचा भाग आहे... जर आपण ती कथा वाचली नसेल तर कृपया प्रथम ती कथा वाचावी आणि नंतर ही कथा वाचावी!

*****

"मग कसा होता माझा परफॉर्मन्स??... ॲज अ रंडी..."

"नंबर वन... रंडी न. १... तुझ्यासारखी रंडी नेहमी मिळावी अशी मी प्रार्थना करेन..." मी मनापासून म्हणालो.

"वेल... तुला प्रार्थना करायची गरज नाही... नुसता माझा नंबर फिरवायचा... तुझी ही रंडी नं १ लगेच हजर होईल..."

"रियली?... ओह नयना... आय लाईक यू!..." असे म्हणत मी तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला...

"नयना नाही... मिसेस सलोनी म्हण..."

नयनाने हसून म्हटले आणि आम्ही दोघीही खळखळून हसलो...

****

त्या रात्री ह्या नयना नावाच्या हाय सोसायटी लेडीने रंडी बनून मला सेक्सची भरपूर मजा दिली. माझ्या बिल्डींगमध्ये दहाव्या मजल्यावर रहाणारी सेक्सी 'सलोनी शर्मा' मला चाळवायची आणि तिला झवण्याची माझी जी फॅन्टसी होती ती नयनाने काही अंशी पुर्ण केली होती...

नंतर काही दिवसांनी माझी बायको परत आल्यावर एकदा मिसेस सलोनी आमच्या घरी आली होती... हॉलमध्ये बसून ती माझ्या बायकोबरोबर गप्पा मारत होती तेवढ्यात मी हॉलमध्ये आलो... मला पाहून ती मादकपणे हसली आणि तिने मला 'हाय हॅल्लो' वगैरे केले... नंतर आम्ही थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. अचानक मिसेस सलोनीने माझ्या बायकोसमोर मला विचारले,

"मग मिस्टर राजेश, त्या दिवशी तुमचे गेट-टुगेदर कसे झाले?"

तिचा प्रश्न मिश्किल होता पण थोडा खोचक होता... ती पटकन असे काही विचारेल असे मला वाटले नव्हते तेव्हा मी थोडा थबकलो पण मी पटकन उत्तर दिले,

"ठिक होते... काही खास स्पेशल असे नव्हते..."

"कसले गेट-टुगेदर रे, राजेश?" माझ्या बायकोने कुतूहलाने विचारले.

"अग...," मी काही बोलायच्या आधीच मिसेस सलोनी उत्साहाने माझ्या बायकोला सांगायला लागली, " तू नव्हतीस ना... तेव्हा एका रात्री तुझ्या मिस्टरांच्या ऑफीसमधील काही 'कलीग' आले होते... म्हणजे मला काही माहीत नव्हते पण मला लिफ्टमध्ये मिस्टर राजेश आणि ती... काय हो नाव तिचे?... ती तुमची ऑफीस कलीग..."

"नयना..." मी पटकन उत्तर दिले. मिसेस सलोनी नक्कीच माझी गोची करत होत्या...

"हो नयनाऽऽ... ती भेटली... तेव्हा मी सहज विचारले तेव्हा हे म्हणाले की ऑफीसमधील काही कलीग आले आहेत.. गेट-टुगेदर आहे म्हणून..."

"हो?... मला माहीत नाही...," माझी बायको आश्चर्याने म्हणाली व पुढे तिने मला नवलाईने विचारले, "अरे राजेश, तू मला सांगितले नाही?..."

"अग... ते...," मी थोडा गडबडलो पण तिला उत्तर दिले, "अग ते अचानक ऑफीसमधले सगळे म्हणाले की राजेश एकटा घरी आहे तर आपण त्याच्याकडे जावूया... ड्रिंक्स, जेवण वगैरे मागवून थोडी धमाल करुया... म्हणून ते त्या रात्री आले होते... दुसऱ्या दिवशी मी तुला सांगणार होतो पण त्या दिवशी नाही का तुझ्या मोबाईलची रेंज मिळत नव्हती... त्या प्रॉब्लेममुळे सांगायचे राहून गेले..."

"अस्स... अरे पण नंतर सांगायचे ना..." माझ्या बायकोला काहीसे माझे कारण पटले...

मनातल्या मनात मी मिसेस सलोनीला जाम शिव्या दिल्या... ती गालातल्या गालात हसत होती असा मला भास झाला...

"अग नंतर कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो..." मी बायकोला म्हणालो.

"अरे पण ही नयना कोण?? तुझ्या ऑफीसमध्ये कोणी नयना नाही..." माझ्या बायकोने उत्सुकतेने विचारले.

"ती ना...," पुन्हा माझी गोची... पण पुन्हा मी हजरजवाबीपणे उत्तर दिले, "अग ती मिस्टर जोशींची नवीन सेक्रेटरी आलीय ना... तिचे नाव नयना... ती इकडे नवीन आहे ना... म्हणून मी तिला आणायला खाली गेलो होतो... तेव्हा लिफ्टमध्ये मिसेस सलोनी आम्हाला भेटल्या होत्या..."

असे बोलून मी तेथून उठलो आणि काही थातूर मातूर कारण सांगून आत निघून गेलो... आत आल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला!... मिसेस सलोनीने माझी आज चांगलीच गोची केली होती... नशीबाने मला पटापट थापा सुचल्या आणि माझ्या बायकोला त्या पटल्या... नाहीतर माझे काही खरे नव्हते... नंतरही माझे कान बाहेर माझी बायको आणि मिसेस सलोनी काय बोलत होत्या त्यावर होते... कारण मी आत आल्यावर मिसेस सलोनी माझ्या बायकोला अजून काही सांगून आमच्यात संशयाचे वातावरण तर तयार करत नाही ना हे मी ऐकत होतो... पण नंतर माझ्या बायकोने इतर काही विषय काढले तेव्हा तो विषय राहून गेला...

त्यानंतर जेव्हा जेव्हा मिसेस सलोनी मला भेटायच्या तेव्हा तेव्हा त्या माझ्याकडे पाहून गुढपणे हसायच्या... तिला नयनाबद्दल काही संशय आला होता की काय असे मला नेहमी वाटायचे... पण तिने कधी स्पष्टपणे मला काही विचारले नाही... नंतर माझ्याशी त्यांचे वागणे थोडे जास्तच फ्री आणि 'मोकळे' झाले होते... आता माझ्यासमोर त्यांचे भरपूर अंगप्रदर्शन होवू लागले... येता-जाता त्यांच्या 'नाजूक' अवयवांचे मला जरा जास्तच स्पर्शसुख मिळू लागले... त्याने माझी त्यांना झवण्याची फॅन्टसी खूपच तिव्र झाली!...

त्या दिवशी पहाटे मी नयनाला तिच्या बिल्डींगमध्ये ड्रॉप केल्यावर तिने मला तिचा मोबाईल नंबर दिला होता. नंतर मग जेव्हा मला चान्स मिळायचा तेव्हा मी तिच्याकडे जायचो किंवा बाहेर एखाद्या हॉटेल रूमवर जायचो आणि आम्ही मनसोक्त झवाझवीचा आनंद घ्यायचो... माझी बायको माहेरी वगैरे गेलेली असली तरी नयनाला पुन्हा कधीही मी माझ्या घरी आणले नाही... न जाणो तिला आणायचो आणि पुन्हा मिसेस सलोनी तिला पहायच्या... तेव्हा तिला माझ्या घरी न आणता मी बाहेरच कोठेतरी झवायचो. प्रत्येकवेळी नयना 'सलोनी' बनायची आणि मला वेगवेगळ्या प्रकारे झवायला द्यायची...

मिसेस सलोनीला झवण्याची माझी जी फॅन्टसी होती ती जरी नयना पुर्ण करत होती तरी मिसेस सलोनीला प्रत्यक्षात झवायला मिळाले तर काय बहार येईल असे मला नेहमी वाटायचे... खास करून जेव्हापासून तिने माझ्या बायकोकडे नयनाबद्दल चुगली केली होती तेव्हापासून तिला झवण्याची माझी इच्छा जास्तच प्रबळ झाली होती... तेव्हा मिसेस सलोनीला रियलमध्ये झवायचा चान्स कसा घ्यायचा ह्याचा मी नेहमी विचार करायचो... तो चान्स मला होळीच्या वेळी मिळाला!!

दरवर्षी आमच्या सोसायटीत आम्ही सगळे टेनंट मिळून रंगपंचमी साजरी करत असू. यंदाच्या रंगपंचमीलाही जंगी तयारी होती... सोसायटीच्या मागच्या गार्डनमध्ये २/३ छोटे तंबू उभे करून आम्ही एकात ओले-सुके रंग, एकात खाणे-पिणे आणि एकात बसण्याची व्यवस्था केली होती... मैदानात ४/५ ठिकाणी रंगाच्या पाण्याने भरलेली पिंप आणि हौद ठेवले होते... सगळी सोसायटीतील मुलें-मुलीं, बायका-पुरुष आणि वयस्कर लोक जमेल तसे रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटत होती... सगळेच एकमेकांच्या ओळखीचे होते तेव्हा कसलाही संकोच नव्हता...

तसे तर मैदानात माझ्या बायकोसकट अनेक बायका मुलीं होत्या पण माझ्या नजरेत फक्त 'मिसेस सलोनी' भरत होती... जेव्हापासून नयना मला मिसेस सलोनी बनून झवायला द्यायला लागली तेव्हापासून मिसेस सलोनी माझ्या नजरेत जास्तच भरत चालली होती व तिला झवण्याची माझी इच्छा तिव्र होत चालली होती. जळीस्थळी मला मिसेस सलोनी दिसत असे तेव्हा रंगपंचमीच्या जल्लोषात मला इतर कोणी नाही तर मिसेस सलोनी फक्त दिसत होती... ती माझेच नाही तर बघण्याऱ्या सगळ्या पुरुषांचे लक्ष वेधून घेत होती कारण रंगपंचमीला तिने ड्रेसच तसा घातला होता...

ती सेक्सी आणि मॉडर्न होती तेव्हा आपल्या ख्यातीला साजेसा ड्रेस तिने होळीला घातला होता... तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली होती जिचा रंग आता 'इस्टमनकलर' झाला होता आणि वर तिने पांढऱ्या रंगाचा बिकीनी ब्रा सारखा ब्लाऊज घातला होता (ब्लाऊजही आता 'कलरफूल' झाला होता). तो बिकीनी टाईप ब्लाऊज वर गळ्यामागे नाडीने बांधला होता आणि खाली पाठीवर नाडीने बांधला होता... ब्लाऊजचे कप तिचे भरगच्च उभार जेमतेम झाकत होते तेव्हा दोन उभारांमधली घळी जास्तच दिसत होती आणि साईडने पाहिले तर ब्लाऊजच्या कपामधून तिचा उभार दिसत होता...

तसे तर अनेक बायका-मुलींनी मॉडर्न ड्रेस घातले होते ज्यातून थोडेफार अंगप्रदर्शन होत होते. आणि पाण्याने भिजल्यानंतर तर बहुतेकांचे ड्रेस 'पारदर्शक' झाले होते व आतील 'अंर्तवस्त्रे' आणि 'फुगीर अवयव' जरा जास्तच दिसत होते... पण सगळ्यांमध्ये मिसेस सलोनी उठून दिसत होती व मस्त माल दिसत होती!... नशीब आमच्या सोसायटीमध्ये बहुतेक सगळे मॉडर्न आणि आधुनिक विचारसरणीचे होते तेव्हा तिच्या त्या ब्लाऊजबद्दल कोणाला काही वाटले नाही...

मी वासनामय नजरेने मिसेस सलोनीचे निरीक्षण करत होतो आणि उघड उघड तिच्याकडे पहायला मला सबळ कारण होते... ती मोस्टली माझ्या बायकोबरोबरच होती आणि माझ्या बायकोकडे पहाण्याच्या बहाण्याने मी मिसेस सलोनीला न्याहाळत होतो... अर्थात! माझ्या बायकोच्या नकळत... मध्ये मध्ये मी त्या दोघींजवळ जावून त्यांच्याबरोबर थटटामस्करी करत होतो व दोघींना हसवण्याचा प्रयत्न करत होतो... त्या जोराने खिदळायला लागल्या की मिसेस सलोनीच्या उभारांची होणारी मोहक हालचाल मी माझ्या हपापलेल्या नजरेने टिपायचो...

मी मिसेस सलोनीला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर ती म्हणाली 'त्यांना रंगपंचमी आवडत नाही आणि तसेही दुपारी ते एका बिझिनेस टूरवर चालले आहेत तेव्हा त्यांना रंग खेळून अंग खराब करून घ्यायचे नाही. तेव्हा ते घरात बसले आहेत'... मी मनात म्हटले 'काय येडझवा नवरा आहे? इतकी सेक्सी बायको असताना तिच्याबरोबर रंगपंचमी खेळायचे सोडून घरात बसला आहे'...

मध्येच एकदा बायकांमध्ये चोंबळाचोंबळी झाली तेव्हा मिसेस सलोनीच्या ब्लाऊजची खालची पाठीवरची नाडी सुटली का ढिल्ली झाली तेव्हा तिने माझ्या बायकोला ती नीट बांधायला सांगितली... माझ्या बायकोने उत्साहाने ती नाडी बांधून दिली.

त्या दोघी हसत खिदळत होत्या आणि त्यांच्यात काय जोक झाला कोणास ठाऊक? माझ्या बायकोने मिसेस सलोनीच्या नितंबावर मागून हलकेच चापट्या मारल्या आणि मिसेस सलोनी खिदळत पुढे पळाली... माझी बायको तिच्या मागे लागली आणि तिने सलोनीला मागून धरली आणि तिला पुन्हा एकदा रंग लावला... त्या झटापटीत माझ्या बायकोकडून सलोनीची छाती दाबली गेली, तिचे नितंब चिवडले गेले आणि ते पाहून माझा जीव कासावीस झाला! माझ्या बायकोच्या ऐवजी मला सलोनीच्या त्या नाजूक अवयवांचे स्पर्शसुख मिळाले असते तर माझी वासना आणि माझा लंड धन्य झाला असता असा विचार माझ्या मनात आला...

एक एक करत नवीन बायका किंवा मुलीं मैदानात यायच्या आणि मग मैदानातील बायका त्या नवीन आलेल्या बाई किंवा मुलीला भिजवायच्या, रंग लावायच्या आणि प्रसंगी पाण्याच्या हौदात टाकायच्या... हसत, खिदळत बायकांचा धिंगाणा चालला होता. अर्थात! पुरुषांमध्येही तेच चालत होते व येणाऱ्या प्रत्येक नवीन पुरुष, मुलाचे स्वागत रंगाच्या हौदातच होत होते... पण माझे लक्ष विशेषत: बायकांवर होते तेव्हा त्यांची धमाल मी गुपचूपपणे पहात होतो...

साधारण अडीच तीन तास धमाल-मस्ती केल्यावर माझी बायको माझ्याजवळ आली आणि म्हणाली की मी थकलेय तेव्हा थोडा वेळ वर घरी जाते... मी ठिक आहे म्हणालो... तसेही ती नसली तर मग मला बायकांना 'न्याहाळताना' जास्त मोकळीक मिळणार होती... माझी बायको घरी निघून गेली आणि मग मी थोड्या जास्तच जोशात रंगपंचमी खेळू लागलो... त्या क्राऊडमध्ये अश्या काही बायका, मुलीं होत्या ज्यांच्याबरोबर माझ्या बायकोचे थोडे हेवेदावे होते व ज्यांना तिच्या उपस्थितीत मी रंग लावण्याचे धाडस केले नव्हते... त्या बायका, मुलींना मी रंग लावून त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या...

माझी बायको गेल्यानंतर मिसेस सलोनी जरा जास्तच माझ्याकडे बघायला लागली... मी पण तिच्यावर एक डोळा ठेवून होतो तेव्हा माझ्या ते लगेच लक्षात आले... बहुतेक तिच्याही ते लक्षात आले होते की फक्त तिला सोडून मी बहुतेक सगळ्या जणींना रंग लावून शुभेच्छा दिल्या होत्या... मला तिला खास करून वेगळ्या पद्धतीने रंग लावायचा होता व होळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या तेव्हा मी तिच्या जवळ जायचे टाळत होतो... एका क्षणी माझी आणि तिची नजरानजर झाली तेव्हा मला असे वाटले की तिने नजरेने मला काही इशारा केला...

मग मिसेस सलोनी बिल्डींगच्या दिशेने चालायला लागली... बिल्डींगमध्ये शिरण्याच्या आधी तिने एकदा मागे वळून पाहिले व एक ओझरता कटाक्ष माझ्यावर टाकला... त्यावरून माझी ट्युब पेटली की तिने मला तिच्या मागे येण्याचा इशारा केला होता... मी लगबगीने पण कोणाच्याही नजरेत भरणार नाही अश्या तऱ्हेने बिल्डींगकडे चालू लागलो... मध्ये मध्ये भेटणाऱ्या लोकांना टाळून मी बिल्डींगच्या लिफ्ट लॉबीमध्ये पोहचलो...

मिसेस सलोनी लिफ्टमध्ये शिरली होती व तिने आतून दरवाजा उघडायचे बटण दाबून लिफ्ट धरून ठेवली होती... मी लिफ्टमध्ये शिरलो तेव्हा तिने पटकन दरवाजा बंद होणारे बटण दाबून धरले आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला... लिफ्टचे दहाव्या मजल्याचे बटण दाबलेले होते व लिफ्ट वर निघाली... ती माझ्या पुढे होती आणि मी तिच्या मागे होतो... जसा लिफ्टचा दरवाजा बंद झाला तसे मी पुढे सरसावलो... माझ्या दोन्ही हातात रंग होता ते हात घेवून मी मागून मिसेस सलोनीला विळखा घातला आणि तिच्या चेहऱ्याला रंग लावला...

"हॅप्पी होली, मिसेस सलोनी!"

"सेम टू यू...!" माझ्या मिठीतून सुटण्याचा लटका प्रयत्न करत तिने उत्तर दिले...

"तुम्ही आज खूप सेक्सी दिसताय...!" तिला मागून चिकटत मी म्हणालो...

"थँक्स!... पण तुम्ही हे काय करताय?" तिने खोट्या तक्रारीच्या स्वरात विचारले...

मी तिच्या बगलेतून हात घालून पुढे तिच्या चेहऱ्याला रंग लावत होतो... तेव्हा तिच्या उभारांवर माझे हात दबले जात होते... मागून मी तिला चिकटलो होतो तेव्हा माझा अर्धवट कडक लंड तिच्या नितंबात रुतला होता... तिला ते कळत होते तरी ती हसत होती व उगाचच हालचाल करून मला अजून स्पर्शसुख देत होती...

"काही नाही... होळी साजरी करतोय..."

"अच्छा!... तुमच्या बायकोबरोबर नाही केली का?" मिसेस सलोनीने चावटपणे हसत म्हटले.

"केली ना... पण तुमच्याबरोबर बाकी राहिली होती... होळी निमित्त आमचे तोंड 'गोड' नाही का करणार?"

"वेल!... होळीला 'चावटपणा' चालतो... तेव्हा तुम्ही स्वत:च तोंड गोड करून घ्या..."

तिने इतका क्लिअर सिग्नल दिल्यावर मी थांबणार थोडीच होतो?... मी पटकन तिला फिरवली आणि तिचा चेहरा माझ्याकडे केला... तिने डोळे मिटून घेतले आणि आपल्या ओठांचा चंबू किंचीत वर करत ती उभी राहिली... मी पटकन तिच्या ओठांवर माझे ओठ दाबले आणि तिच्या टपोऱ्या रसाळ ओठांचे चुंबन घ्यायला लागलो... तिला मिठीत घटट पकडून मी आवळत होतो... तिने डोळे मिटले होते पण माझा डोळा लिफ्टच्या इंडीकेटरवर होता... सातवा मजला पास झाला होता... तिचे एक रसरशीत चुंबन घेवून मी तिला विचारले,

"मिसेस सलोनी... होली-मिलनाचा चान्स कधी मिळणार मला??"

"वेल!... मिस्टर शर्मा दुपारी चाललेत टूरवर... नंतर मी घरात 'एकटी' आहे... होळीला 'जोर-जबरदस्ती' चालते... आले का लक्षात?"

तेवढ्यात लिफ्ट दहाव्या मजल्यावर पोहचली... लिफ्टचा दरवाजा उघडेपर्यंत मिसेस सलोनीने माझ्या डोळ्यात पहात मादक स्वरात मला म्हटले, "समझनेवाले को इशारा काफी है!... क्यों?"

दरवाजा उघडला आणि ती बाहेर पडली... मी पटकन तिला म्हणालो, "मी येतो सहा वाजता..."

मागे वळून पहात ती हसली आणि हळूच म्हणाली, "सहा नाही चार वाजता या..."

मी अंगठा वर करून तिला 'डन' चा इशारा केला आणि आठव्या मजल्याचे बटण दाबले... लिफ्टचा दरवाजा बंद होत गेला आणि बाहेर ती गाणे गुणगूणत आपल्या घराच्या दरवाज्याकडे निघाली... मला आनंदाने भोवळ यायचे तेवढे बाकी राहिले! मिसेस सलोनीला लिफ्टमध्ये चोंबाळण्याचे मी धाडस केले हे मला खरेच वाटत नव्हते! त्यावर तिने मला ती एकटी असताना घरी यायचे आमंत्रण दिले ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता!... मी अक्षरश: हवेत तरंगायला लागलो... आठवा मजला येवून लिफ्टचा दरवाजा उघडला तरी मी लिफ्टमधून बाहेर पडलो नाही... जेव्हा लिफ्टचा दरवाजा पुन्हा बंद होवू लागला तेव्हा मी भानावर आलो आणि पटकन बाहेर पडलो...

नंतर मग माझा रंगपंचमी खेळण्याचा मूड गेला व मी माझ्या घरात आलो... थोड्या वेळानंतर माझी बायको पुन्हा खाली रंगपंचमी खेळायला गेली पण मी पुन्हा बाहेर पडलो नाही... माझ्या मनात मिसेस सलोनीला चार वाजता भेटण्याची आतुरता चालू झाली होती तेव्हा माझे कशातही लक्ष लागेना... चार कधी वाजतायेत असे मला व्हायला लागले... चार वाजता माझ्या बायकोला काय कारण सांगून बाहेर पडावे ह्याबद्दल मी विचार करायला लागलो तेव्हा मला आठवले की साडेचारच्या दरम्यान माझी बायको बाहेर जाणार होती.

तिची एक मैत्रीण सबर्बन मध्ये रहाते तिच्या घरी काही कार्यक्रम होता त्यासाठी तिने माझ्या बायकोला बोलावले होते... माझी बायको मला बरोबर चला म्हणून विचारत होती पण मी तिला नकार दिला होता... एकतर रंगपंचमी खेळून दमायला होणार होते तेव्हा लगेच कोठे बाहेर जायचा माझा मूड नव्हता म्हणून मी तिला एकटीनेच जायला सांगितले होते... ती गेली की ३/४ तास तरी येणार नव्हती तेव्हा मला रान मोकळे होते... तेव्हा मी निर्धास्त झालो आणि माझी बायको रंगपंचमी खेळून परत यायची वाट पाहू लागलो...

तासाभरानंतर माझी बायको आली... खाली काय काय गंमतीजमती घडल्या त्या ती उत्साहाने सांगायला लागली... मग आम्ही दोघेही अंघोळ करायला शॉवरमध्ये घुसलो... आम्ही दोघे पुर्ण नागडे झालो आणि एकमेकांचे अंग घासून अंगावरील रंग काढू लागलो... माझ्या बायकोच्या छाती, नितंबाला कुस्करून, मध्ये मध्ये तिचे चुंबन घेवून मी तिला तापवली... ती पण माझा लंड चोळत होती तेव्हा मी पण गरम झालो होतो... मग तेथेच बाथरूममध्ये मी तिला ओणवी केली आणि तिला मागून झवायला लागलो...

तिला मागून झवताना मला मिसेस सलोनीची आठवण आली आणि मनात विचार आला की अजून काही तासानंतर मी अशीच मिसेस सलोनीची गांड मारत असेल... तिच्या पुच्चीत असाच माझा लंड आत-बाहेर होत असेल... त्या विचाराने मला एकदम टोकावर नेले आणि मी माझ्या बायकोच्या पुच्चीत लंड गाळायला लागलो... ती खालून आपला दाणा घासत होती तेव्हा ती पण काही क्षणात कामतृप्त झाली... नंतर आम्ही व्यवस्थित अंग स्वच्छ करून अंघोळ केली आणि बाहेर आलो... जेवण आम्ही बाहेरूनच मागवले आणि ते खावून थोडा वेळ आम्ही झोपलो...

साधारण तीन वाजता मी माझ्या बायकोला उठवले आणि तिला जायचे म्हणून तयार व्हायला सांगितले... ती थोडी कंटाळली होती तेव्हा नाही जात म्हणायला लागली... ती जर गेली नाही तर माझ्या प्लानींगचा बटटयाबोळ होणार होता तेव्हा मी तिला समजावून सांगू लागलो की ती जर गेली नाही तर तिच्या मैत्रिणीला वाईट वाटेल तेव्हा तिने जायला पाहिजे वगैरे वगैरे... शेवटी ती जायला तयार झाली आणि उठली...

मग तिने आवरायला घेतले... मी बेडवर पडूनच राहिलो असे दाखवत की मी पडूनच रहाणार आहे व रात्रीपर्यंत मस्त झोपणार आहे... माझ्या बायकोने साडी घातली, मेक.अप वगैरे केले आणि ती तयार झाली... तरी सगळे आवरायला तिला सव्वा चार वाजले... माझे लक्ष पुर्णवेळ घड्याळावर होते... शेवटी दहा मिनीटात मला किस वगैरे करून माझी बायको बाहेर पडली... ती गेल्यावर दहा मिनीटे मी जबरदस्ती बेडवर पडून राहिलो... अचानक ती परत आली तर मी झोपलोय हे तिला दिसायला हवे होते...

मग मी उठलो आणि भराभर फ्रेश व्हायला लागलो... मला वरच दहाव्या मजल्यावर जायचे होते म्हणून मी कॅज्युअल ट्रॅक-पॅन्ट व टि-शर्ट घातले आणि बाहेर पडलो... लिफ्टसाठी वाट पहाण्याचाही धीर माझ्यात नव्हता तेव्हा मी जीन्यानेच दोन दोन पायऱ्या चढत वर दहाव्या मजल्यावर गेलो... मिसेस सलोनीच्या दरवाज्याबाहेर मी पोहचलो तेव्हा माझा श्वास फूलला होता व मला किंचीत धाप लागली होती... एक मिनीट स्तब्ध उभा राहून मी दम घेतला आणि मगच बेल वाजवली... तिचा नवरा तर घरात नसेल ना? असा भयानक प्रश्न माझ्या मनात डोकावला...

पण मी बेल मारत असतानाच अचानक दरवाजा उघडला आणि हसऱ्या चेहऱ्याच्या मिसेस सलोनीने मला आत ओढलो... बहुतेक ती दरवाज्यातच उभे राहून माझी वाट पहात होती... मला ती त्यांच्या हॉलमध्ये घेवून गेली आणि तिने मला बसायला सांगितले... मिसेस सलोनीने काळ्या रंगाचा एक सेक्सी गाऊन घातला होता जो थोडा पारदर्शक होता. आतमध्ये तिने घातलेली लाल रंगाची ब्रेसीयर आणि पॅन्टी वरून दिसत होती... गाऊनचा गळा इतका खोल होता की त्यातून तिच्या उभाराची घळ स्पष्ट दिसत होती... माझे लक्ष तिच्या गाऊनच्या गळ्यावर जात होते हे तिच्या लक्षात आले आणि ती मंदपणे हसत आत निघून गेली... तिला पाहून माझा लंड ऑलरेडी उठायला लागला होता...

काही क्षणात ती सरबताने भरलेले दोन ग्लास घेवून बाहेर आली आणि मला एक ग्लास देत ती माझ्या बाजूला सोफ्यावर बसली... मग आम्ही रंगपंचमीबद्दल बोलत सरबत घ्यायला लागलो. मी तिच्या मिस्टरांची चौकशी केली तर ती म्हणाली 'ते तीन वाजताच निघून गेले होते'... ते परत कधी येणार हे विचारले तर ती म्हणाली दोन दिवसानंतर येणार आहेत... मी मनात विचार करू लागलो... म्हणजे आत्ता मी तिला झवण्यात सक्सेस झालो तर मला पुढे २ दिवसात २/३ वेळा तरी तिच्याबरोबर मजा करता येणार होती... तेव्हा आत्ता हा चान्स सोडायचा नाही व तिला कसेही करून झवायचेच असा मी निश्चय केला...

माझे सरबत पिवून झाल्यावर मी ग्लास पुढच्या टिपॉयवर ठेवला आणि मिसेस सलोनी तो घ्यायला पुढे वाकली... ती संधी साधून मी तिला मागून आवळले आणि माझ्या अंगावर खेचले... थोडीशी लाजत हसत ती माझ्या मिठीत आली आणि मादक स्वरात म्हणाली,

"काय? इतके उतावळे झालात का?... जराही दम धरवत नाही??"

"नाही ना...," तिला गच्च पकडून तिच्या गालाचे चुंबन घेत मी म्हणालो, "तुम्ही चार वाजता या म्हणून सांगितल्यापासून माझे मन एकदम सैरभैर झाले होते... कधी चार वाजतात आणि तुमच्याकडे येतो असे झाले होते..."

"हंऽऽऽ... म्हणून इतक्या उशीरा आलात..." सलोनीने लटकेपणे म्हटले.

"ती माझी बायको बाहेर जाणार होती... तिला जायला उशीर झाला तेव्हा मला यायला उशीर झाला..."

"हो! म्हणाली होती ती मला... तिला तिच्या मैत्रिणीकडे जायचे आहे ते... जर ती परत आली तर??" पुन्हा मिसेस सलोनीने त्या दिवशीसारखे थोडे खोचटपणे हसत विचारले...

"मिस्टर शर्मा परत आले तर??... मग तुम्हाला कसे वाटेल??... तसेच मला वाटेल..." मी तिच्या छातीच्या उभारांवर हात ठेवत उत्तर दिले...

माझ्या हजरजवाबी उत्तराने तिला मजा वाटली आणि तिने प्रेमाने माझ्या हातावर चापट मारली... मग तिने वळून माझ्याकडे पाहिले आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवत मला विचारले,

"एक विचारू का, राजेश?"

"उंऽऽऽऽ... विचारा..." तिच्या ओठांचे चुंबन घेत मी म्हटले..

"ती नयना कोण होती??"

"तीऽऽऽ... सांगितले ना... आमच्या ऑफीसमधली कलीग..."

"उंहंऽऽऽ... मला माहीत आहे... ती तुमच्या ऑफीसमधली नव्हती... त्या दिवशी तुम्ही मला लिफ्टमध्ये भेटलात तेव्हा पण मला संशय होता आणि तुमच्या बायकोसमोर तिचा विषय जेव्हा मी काढला तेव्हा पण ते सिद्ध झाले... तेव्हा मला आता खरे सांगा..." तिने हसत म्हटले.

"अग खरच ती माझी ऑफीस कलीग आहे... त्या दिवशी माझ्याकडे गेट-टुगेदर होते म्हणून ती आली होती..." मी तरीही नन्नाचा पाढा चालू ठेवला...

"मिस्टर राजेश... तुमच्याकडे त्या दिवशी काहीही गेट-टुगेदर नव्हते... कारण मी एकदा दोनदा तुमच्या फ्लॅटच्या दरवाज्यात येवून चेक केले होते... आत बरीच माणसे असल्यासारखा काहीही आवाज येत नव्हता..." मिसेस सलोनीने हसत खुलासा केला...

"काय सांगता काय, मिसेस सलोनी?? तुम्ही माझ्या दरवाज्याच्या बाहेरून चेक केले??"

"आय ॲम सॉरी! पण येस... मला शंका होती आणि उत्सुकताही होती की ती कोण असेल... तेव्हा मी चेक करायला आले होते..."

"मग तुम्हाला काय वाटते?... ती कोण असेल??" मी तिचे उभार दाबत मिश्किलपणे तिला विचारले.

"ती बहुतेक वेश्या होती..." मिसेस सलोनीने बेधडकपणे आपला अंदाज सांगितला...

"वेल!... ती वेश्या नव्हती... ती एक हाय सोसायटी लेडी होती..."

असे बोलून मी मिसेस सलोनीला थोडक्यात त्या रात्रीची सगळी घटना सांगितली... सिनेमा थिएटरमधून मी नयनाला पाहिल्यापासून पहाटे मी तिला तिच्या घरी सोडेपर्यंत काय काय कसे कसे घडले ते सगळे थोडक्यात सांगितले... अर्थात! मी नयनाला 'मिसेस सलोनी' बनवून झवलो हे मी तिला सांगितले नाही...

"आय सी... म्हणजे माझा अंदाज काही अंशी खरा होता... ती जरी खरी वेश्या नव्हती तरी तुम्ही तिला वेश्या समजूनच घरी आणली होती...," मिसेस सलोनीने हसत म्हटले आणि पुढे मला विचारले, "वेल! मग त्या रात्री तुम्ही तिच्याबरोबर भरपूर मजा केली असेल ना??"

Category: Erotic Couplings Stories